Motibindu ani Gairsamaj

Categories
Popular Posts

Motibindu ani Gairsamaj

मोतीबिंदू समज आणि गैरसमज

डॉ चिपाडे - नेत्रतज्ज्ञ ठाणे

गैरसमज 1 - मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही आंघोळ करू शकत नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात अशी शस्त्रक्रिया टाळावी

खरी परिस्थिती ही आहे की कोणतेही ऑपरेशन केल्यानंतर आपण मानेच्या खालून आंघोळ करतो तशी आंघोळ केली तर काहीही समस्या होत नाही. यामुळे आपण कोणत्याही ऋतूमध्ये ही शस्त्रक्रिया करू शकतो फक्त पेशंटनी आणि त्याच्या घरच्या लोकांनी व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे

गैरसमज 2 - पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याची चान्सेस जास्त असतात म्हणून ही सर्जरी टाळावी.

खरी परिस्थिती ही आहे की आता शस्त्रक्रिया जी केली जाते ती ऑपरेशन थेटर मध्ये केली जाते आणि त्याच्या आत एअर कंडिशन वातावरण असतं. त्यामुळे इन्फेक्शन व्हायची चान्सेस फार कमी असतात. याचाच अर्थ की बाहेरच्या ऋतूचा या शस्त्रक्रिये वरती काहीही परिणाम होत नाही . जर व्यवस्थित काळजी घेतली तर इन्फेक्शन चे प्रमाण एक लाखांमध्ये एखाद्या केसला इन्फेक्शन होऊ शकते.

गैरसमज 3 - मोतीबिंदू पूर्ण पिकलानंतरच त्याचं ऑपरेशन करता येतं. 

खरी परिस्थिती ही आहे की आधी जेव्हा शस्त्रक्रिया करायचं तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं तेव्हा मोतीबिंदू पूर्ण पिकेस्तवर डॉक्टर थांबायचे. आता जे प्रगतशील शस्त्रक्रिया करायचं तंत्रज्ञान विकसित आहे त्यामुळे मोतीबिंदू जसा तुमच्या आपले सामान्य जीवन विस्कळीत करायला लागतो तसं ताबडतोब मोतीबिंदूचा ऑपरेशन करता येतं. याच्या करता एक साधी परीक्षा अशी आहे की तुम्हाला तुमच्या चष्म्याने दिसायला प्रॉब्लेम व्हायला लागला तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

गैरसमज ४ आय ड्रॉप्स टाकल्यामुळे मेतू मोतीबिंदू विरघळून जाईल आणि ऑपरेशन करायची आवश्यकता लागणार नाही

सध्या उपलब्ध जे उपाय आहे त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया हा एकमेव मोतीबिंदू वरती प्रभावित उपचार आहे.

गैरसमज ५ मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया केल्यानंतर सामान्य स्थितीला भरपूर महिन्याचा कालावधी जातो आणि त्यामुळे दैनंदिन कामावरती मोठा प्रभाव होतो

सध्याच्या पद्धतीने अत्यंत विकसित तंत्रज्ञानाने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते ज्याच्या करता एक दिवस लागतो. पेशंट त्या दिवशीच घरी जाऊ शकतो. त्यानंतर तीन-चार दिवसांमध्ये आपण आपले दैनंदिन काम चालू करू शकतो.  प्रॉपर कामावरती रुजू होण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो

गैरसमज ६ बऱ्याच लोकांना असं वाटतं की दृष्टी धूसर होणे हे वयोमानाप्रमाणे होणारच आणि त्याकरता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे याची काहीही आवश्यकता नाही

सत्य हे आहे की जर वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन जर शस्त्रक्रिया केली तर तुमची नजर नॉर्मल होऊ शकते. याबाबतीत टाळाटाळ केली तर पुढे जाऊन त्याचा विपरीत परिणाम तुमच्या डोळ्यावरती होऊ शकतो.

गैरसमज ७ मोतीबिंदूस ही शस्त्रक्रिया हाय ब्लड प्रेशर किंवा मधुमेह म्हणजे डायबिटीसच्या पेशंटसाठी धोकादायक आहे

सत्य हे आहे की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायच्या आधी डॉक्टरची मदत घेऊन हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस याला पूर्णपणे नियंत्रण आणून नंतरच शस्त्रक्रिया केली जाते.  

Enquire