Me ani Sangeet
09-10-24
मी आणी संगीत
लहानपणा पासून अभ्यास आणी मैदानी खेळ खेळण्यात मी जास्त रममाण होत असे. अभ्यासात हुशार होतोच. तसेच क्रिकेट हा माझा आवडता खेळ आणी छंद. शाळेतून दुपारी घरी आल्यावर दप्तर भिरकावून मैदाना कडे धावत सुटायचो. पुढे क्रिकेट खेळण्यांचा माझा छंद निरंतर चालूच होता. वयाचा ४४ वर्षांपर्यंत खेळलो. त्याच काळात घरात संगीत चे पण वातावरण होते. अगदी लहानपणा पासून वडिलांचे भजन, गायन व सतार ऐकायचो. ते सतार शिकवण्या पण घ्यायचे. नंतर मोठी बहीण, मोठा भाऊ व लहान बहिण गाणं उत्तम म्हणायचे. दोन्ही बहिणी संगीत घेऊन विशारद झाल्या होत्या. मोठा भाऊ गाणं फारच छान म्हणायचा. ते सगळे सूर, ताल मनात, कानांवर पडत असायचे. पण मी कधीच त्याकडे फारसं लक्ष दिले नाही. मी आणी क्रिकेट यातंच मस्त होतो. हां, बाथरूम मधे आंघोळ करताना जोर जोरात गाणं म्हणायचो. साग्रसंगीत अंघोळ असायची.
घरात हारमोनियम, तबला, सतार इत्यादि वाद्य होतीच. बहिणीं ला शिकवण्या करिता गुरुजी यायचे. ते ऐकायचो. राग मालकंस, यमन हे माझे आवडते राग. बरयाच वेळा हारमोनियम वर फिल्मी गाणी वाजवण्याचा प्रयत्न करीत असे. बरीच गाणी बसवली पण होती. पण खूप लक्ष नाही दिले. एक विरंगुळा म्हणून सर्व करायचो.
अजून एक आवड किंवा छंद म्हणजे सिनेमा बघणे व नाटकात अभिनय करायचा होता. सिनेमा बघून आल्यावर त्यातील एखादा कलाकाराची नक्कल आरश्या समोर उभे राहून करण्यात मजा यायची. लहानपणी अलाहाबाद (आताचे प्रयागराज ) येथे असताना, गणपती उत्सवा करिता बेईमान हे नाटक बसवले होते. त्यात एक लहान मुलगा (भुलवा) चा रोल करायची संधी मिळाली. उत्सुफूर्त अभिनयाचे बक्षीस ही मिळाले. इथूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. कोजागिरी उत्सवात दर वर्षी एक नाटिका (हिंदी) सादर करायचो, मज्जाच मज्जा.
कालांतराने अभ्यास व इंजिनियरिंग इत्यादि करण्यात वेळ गेला व संगीत कडे दुर्लक्ष झाले, तरीही कालेजच्या कार्यक्रमात आवर्जून गाणं म्हणायचो. सार्वजनिक गणपती उत्सवात नाटकात अभिनय करण्याची भरपूर संधी मिळाली. एअर इंडियात नोकरी सुरू झाल्यामुळे कोलकता येथे आलो व आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली. येथे आमची भेट अर्धांगिनी बरोबर झाली. तिच्या बरोबर महाराष्ट्र मंडळ कोलकाता येथे नाटकात भूमिका करण्याची संधी मिळाली. साधारणतः 50-60 नाटकात अभिनय केला.दर वर्षी दिल्ली येथे बृहन्महाराष्ट्र नाट्य स्पर्धा व्हायचा. महाराष्ट्र मंडळ कोलकाता कडून या स्पर्धेत भाग घेतला. सूर्यास्त, या जयवंत दळवी लिखित नाटकात अभिनयाचे सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळाले. सूर्याची पिल्ले,वल्लभपूरची दंतकथा, वरचा मजला रिकामा, इ. अनेक, नाटकात मुख्य भूमिका साकारल्या तसंच कोलकत्यातील बंगाली नाट्य संस्थें बरोबर असायचो व बंगाली नाटकात पण अभिनय केला. बंगाली सिरियल मधे काम करण्याची पण संधी मिळाली. या सगळ्यात क्रिकेट खेळणे पण सुरूच होते. राज्य स्तरीत क्रिकेट स्पर्धेत 2-3 वेळा उत्कृष्ट गोलंदाजी चे बक्षीस ही मिळाले.
या काळात संगीत थोडं मागे पडलं. कधी मधी एखादा घरगुती कार्यक्रमात गायचो. १९९४ मध्ये माझी बदली मुंबई येथे झाली. ठाण्यात वास्तव्य सुरु झाले. पण मुंबईच्या दगदगीत व इतर कारणां मुळे, ह&l